Posts

Image
जाणीव प्रतिष्ठान शहापुरचा दिवाळी निमित्त फराळ व भाऊबीज कार्यक्रम आदिवासी पाड्यावर        ज्यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवस सारखाच असतो, अशा कष्टकरी आदिवासींसोबत जाणीव प्रतिष्ठानच्या सदस्यांनी दिवाळी आणि भाऊबीज साजरी केली. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील पायरवाडी (आदिवली) येथे ४ नोव्हेंबर २०१८ रोजी आदिवासी कुटुंबांसोबत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.         दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पायरवाडीतील कुटुंबांना दिवाळी फराळ, तसेच कुटुंबातील प्रत्येक महिलेला भाऊबीज भेट म्हणून साडीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात पायरवाडी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या गोड गळ्याने सादर केलेली सुमधुर गीते व पायरवाडीतील महिलांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.         कार्यक्रमाच्या सुरुवातीला पायरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आपल्या हातांनी बनवलेली सुंदर, सुविचारयुक्त भेटकार्डे देऊन सर्वांचे स्वागत केले. या वेळी जाणीव प्रतिष्ठानचे...